Mumbai Indians मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आधीच अडचणींचा सामना करतोय. मुंबईच्या टीमची सूत्र हाती घेतल्यापासून त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यात यंदाच्या सीजनची टीमसाठी सुरुवात चांगली झालेली नाही. मुंबई इंडियन्सने तिन्ही सामने गमावून पराभवाची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एकमेव विजय मिळवला. पाच सीजन आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या या स्थितीसाठी Hardik Pandya हार्दिक पांड्याला जबाबदार धरल जातय. त्यातच व्यक्तीगत आघाडीवर हार्दिक पांड्यासाठी एक वाईट बातमी आहे. हार्दिक पांड्याच्या मोठ्या चुलत भावाला फसवणूक प्रकरणात अटक झाली आहे. हार्दिक आणि क्रृणाल पांड्याला फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 4.3 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. हार्दिक आणि क्रृणालची फसवणूक केल्याप्रकरणी Vaibhav Pandya वैभव पांड्याला अटक करण्यात आलीय.
हार्दिक आणि क्रृणालची फसवणूक केल्याप्रकरणी Vaibhav Pandya वैभव पांड्याला अटक करण्यात आलीय.