प्रणिती शिंदेचा लेटरबॉम्ब ; राम सातपुतेंना उद्देशून पत्र praniti shinde letterbomb on ram satpute


सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून पत्र लिहिलं आहे.

प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना जे पत्र लिहिलं आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

 मा. राम सातपुते जी,

‘आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते.’

‘लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.’

‘सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते.’

प्रणिती सुशीलकुमार शिंदे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.