Elon Musk भारत भेटीवर, Tesla भारतात Investment करणार ?

 Elon Musk भारत भेटीवर

electric  कार तयार करणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचा मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या भेटीत तो पंतप्रधान narendra  modi यांची भेट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मस्क भारतात टेस्लासाठी गुंतवणूक योजनेची घोषणा करु शकतो. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मस्क भारत भेटीवर येत आहे. त्याच्यासोबत कंपनीचे इतर अधिकारी पण असतील. elon musk भारत भेटीवर येण्यापूर्वीच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक खास धोरण जाहीर केले आहे. त्यातंर्गत देशात कमीत कमी 50 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाच आयात शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. तसेच या कंपन्यांना स्थानिक पुरवठादारांकडून माल खरेदी करावा लागणार आहे. जगातील मोठं-मोठ्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी काही सवलती पण जाहीर करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.