परळी माझी माय असेल, तर पाथर्डी माझी मावशी आहे.

 

परळी माझी माय असेल, तर पाथर्डी माझी मावशी आहे.

मुंडे कुटुंबीय आणि पाथर्डीचं एक वेगळ नातं आहे. स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे परळी माझी माय असेल, तर पाथर्डी माझी मावशी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि पाथर्डीचंही तसंच नातं आतापर्यंत आहे.


प्रीतम मुंडे आमदार ? 
मधल्या काळात पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभा लढवावी अशी लोकांची भावना होती. मात्र, आता प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. जर प्रीतम मुंडे यांना शेवगाव-पाथर्डीतून लढण्याची इच्छा असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी शेवगाव-पाथर्डीतून निवडणूक लढवावी, अशी माझी भूमिका आहे, असं भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी म्हंटलं आहे.
शेवगाव पाथर्डी मधून पुनर्वर्सन  ?


शेवगाव-पाथर्डी विधानसभेच प्रतिनिधित्व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या करतात. मोनिका राजळे यांच्या विजयात मुंडे कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात वंजारी समाजाचा मतदार मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे. त्यातच आता भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी-शेवगाव मधून उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणू असं म्हटलं आहे. 

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.