आपल्या घरात असलेल्या कोरफडीचे फायदेच फायदे,जाणून घ्या

 आपल्या घरात आपण कुंडीमध्ये कोरफड लावतो. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफड सर्दी , खोकल्या पासून निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते. कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मामुळे सर्दी,खोकला,दमा ,सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते . कोरफडीचा ताजा रस मलावरोध ,अपचन ऍसिडिटी अशा पचन संस्थेच्या आजारांवर गुणकारी आहेत. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्यास कोलेस्ट्रॉल ,मधुमेह मुळव्याधी असे आजार कमी होतात. अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होत. जळण भाजणं ,आग होणं ,पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो. कोरफडीमुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते केस गळती थांबते ,केस दाट आणि मजबूत होतात 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.