मंगळवेढा : सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी भाजपाकडून उमेदवाराच्या शर्यतीत असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या अॅड कोमल ढोबळे-साळुंखे यांना उमेदवारी डावलल्यानंतर त्यांनी चक्क खा.शरद पवारासोबतचा कौटुंबिक फोटोचा व्हाट्सअप स्टेटस ठेवत लावा तर्क असे संकेत देत भविष्यात तुतारी हाती घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली.
अॅड कोमल ढोबळे या उच्चशिक्षित असल्यामुळे यांच्या नावाचा विचार होईल अशी शक्यता होती मात्र पक्षाने जिल्ह्यातील अनेक इच्छुकांना डावलत माळशिरसचे आ.राम सातपुते यांना उमेदवारी निश्चित केली.
व्हाट्सअप वर ठेवलेल्या फोटोमुळे निर्माण झाली.अॅड कोमल ढोबळे साळुंखे यांनी तुतारी फुंकल्यास भविष्यात त्याचे पडसाद मंगळवेढा व मोहोळ तालुक्याच्या राजकारणात देखील दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.