Tata Nexon ने दणक्यात आणली CNG कार; 'हे' फिचर असणारी ठरणार देशातील पहिली SUV

टाटा मोटर्सने आता पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कारनंतर सीएनजीकडे लक्ष वळवलं आहे. मारुती आणि हुंडाई यांनी सध्या या बाजारपेठेवर कब्जा केला आहे. पण टाटाने आता या क्षेत्रातही अव्वल ठरण्याच्या हेतूने कंबर कसली आहे. टाटा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोपमध्ये कंपनीने आपली Tata Nexon CNG सादर करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने काही फोटो शेअर केले आहे.

सध्या ही कॉन्सेप्ट कार असून, निर्मितीनंतर ती लवकरच ती सर्वांसमोर आणली जाणार आहे. यानंतर ही कार विक्रीसाठी लाँच केली जाईल. सीएनजी कार सध्याच्या नेक्सॉन फेसलिफ्टवरच आधारित आहे. पण सीएनजी कार असल्याने यात काही गरजेचे बदल कऱण्यात आले आहेत. लाँच झाल्यानंतर टाटा नेक्सॉन देशातील एकमेव कार असेल आहे जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असा चारही पर्यायात उपलब्ध असेल. 

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.