या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ९० दिवसांची वैधता मिळते. तसेच, तुम्हाला या प्लॅनमध्ये डेली २जीबी डेटा म्हणजे एकूण १८०जीबी डेटा दिला जात आहे. इतकेच नव्हे तर रिचार्जमध्ये युजर्सना २०जीबी एक्स्ट्रा डेटा देखील दिला जात आहे. त्याचबरोबर तुम्ही ९० दिवस कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग, डेली १०० एसएमएसचा देखील लाभ मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचं देखील फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. जिओ या प्लॅनमध्ये एलिजिबल युजर्सना अनलिमिटेड ५जी डेटा देखील ऑफर करत आहे.
Jio चा २२२ रुपयांचा प्लॅन
जिओच्या २२२ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण ५० जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. तसेच, या प्लॅनची व्हॅलिडिटी पाहता प्लॅन डेटा अॅड-ऑन प्लॅन म्हणून आला आहे. म्हणजे याची व्हॅलिडिटी तुमच्या चालू प्लॅन समाप्त होईस्तोवर किंवा जास्तीत जास्त ३० दिवस वैध राहील.
Jio चा ४९ रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन देखील कंपनीनं क्रिकेट प्लॅन कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. रिचार्जमध्ये युजर्सना एकूण २५जीबी डेटा आणि एक दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये डेटा व्यतिरिक्त आणि कोणतेही लाभ मिळत नाहीत. जर तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ हवा असेल दुसरा एखादा रिचार्ज करावा लागेल.