नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निकाल विरोधात गेल्यास राणा यांना निवडणूक लढवता येणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन भाजपनं पर्याय तयार ठेवले आहेत. प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्या मूळच्या अकोला
जिल्ह्यातील आहेत. दिवंगत रिपब्लिकन नेते रा. सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई यांच्यासह एका माजी आयएएस अधिकाऱ्याचं नावही विचाराधीन आहे. त्यामुळे भाजपकडे अमरावतीसाठी तीन पर्याय तयार आहेत. राणा यांच्या विरोधात निकाल गेल्यास या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला ?
0
مارس 25, 2024