शिंदे गटात अस्वस्थता !


धुळवडीच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी समर्थकांसह मुख्यमंत्र्यांचे ठाणे येथील निवासस्थान गाठून तेथे ठिय्या दिला. ‘नाशिक मतदारसंघ सोडू नका’ असा त्यांचा आग्रह होता. त्याचप्रमाणे कोल्हापूर, वाशीम, शिर्डी, रामटेक यासारख्या काही जागांवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याने येथील विद्यमान खासदाराही अस्वस्थ आहेत. पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्याविरोधात पालघर आणि वसईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आघाडी उघडत उमेदवार बदला, अशी मागणी लावून धरल्याने गावितही नाराज आहेत. त्यातच मनसेच्या समावेशाला शिंदे गटातील काही खासदारांचा विरोध आहे.

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.