"ठाकरेंसोबत आमची आघाडी राहिली नाही. आता महाविकास आघाडीत जमलं तर आमची आघाडी आहे, नाहीतर नाही."
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षासोबत आता वंचित बहुजन आघाडी राहिलेली नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. 'आता जर महाविकास आघाडीसोबत जमलं तर आघाडी आहे, नाही जमलं तर नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती, पण शिवसेनेने महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं, असेही आंबेडकर म्हणाले. (Latest Marathi News)
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, "शाहू महाराज यांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब आम्ही चळवळीच्या जवळील मानतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते केले जातील."