मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकील महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार असून ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.